Breaking News

नांदेड जिल्हयात मुसळधार पावसासह वीजेचे थैमान, दोन ठार चार जखमी

नांदेड, दि. 23, ऑक्टोबर -  काल शनिवारी नांदेड जिल्ह्यातील माहूर व इतर तालुक्यात विजेच्या कडकाडाटासह जोराचा पाउस पडला त्यात बंजारा तांडा येथे वीज पडून दोन तरू ण ठार झाले तर मुरली येथे महिला जखमी झाली. वझरा येथे दोन बैल ठार झाले आहेत.तर नेर येथे तीन तरूण जखमी झाले. 
काल दुपारी पावसाने अक्षरशहा धुमाकुळ घातला. सायंकाळी पाचच्या सुमारास बंजारा तांडा येथे बकर्या चारण्याकरिता बादल फकीरा चव्हाण (वय 18) चंदन देवीदास राठोड  (वय16) दोघेही शेतात गेले होते अचानक वीजा चमकु लागल्या आणि वादळी पाउस आल्याने त्यांनी झाडाचा आसरा घेतला.मात्र वीज पडून ते जागीच मरण पावले आणि फक्त बक र्या घरी आल्या ते कुठे गेले याचा पालकांनी शोध घेतला असता सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान तेराणात मरण पावलेले दिसले. वझरा येथे प्रकाश जगदाळे यांच्या शेतात विज  पडून दोन बैल ठार झाले.
मुरली या गावी शेतात पुजा पुलाते (वय 20) या महिलेच्या अंगावर विज पडल्याने ती गंभीर जखमी झाली. नेर या गावीहि नितेश गायकवाड (वय 26), अंकुश गायकवाड (वय  27), गजानन गायकवाड (वय 23) यांच्या अंगावर वीज पडली.ते जखमी आहेत.