Breaking News

उच्च न्यायालयाचे आदेश असले तरी मिनी घाटी लांबणीवरच !

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - हायकोर्टाच्या दणक्यानंतरही जिल्हा सामान्य रुग्णालयाचे (मिनी घाटी) कामकाज सुरू होणे लांबणीवरच पडणार आणि पुढील वर्षातच हे काम सुरू  होेईल अशी चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी या जिल्हा रूग्णालयत किमान ‘ओपीडी’ सुरू करण्याची हालचाल झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ओपीडी’ सुरू क रण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी जाहीर देखील करून टाकले, मात्र आरोग्य मंत्र्यांच्या आदेशानंतर ते रद्द करण्यात आले आणि आता पूर्णपणे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्याचे ठरत  असून त्यासाठी उपकरण खरेदीची प्रक्रिया व प्रत्यक्ष उपकरणे, साहित्य व मनुष्यबख उपलब्ध होईपर्यंत पुढील वर्षाचे काही महिने लोटणार असे दिसत आहे. याचा अर्थ नोव्हें बरअखेरपर्यंत हे रुग्णालय सुरू करण्याचे हायकोर्टाचे आदेश पुन्हा खुंटीला लावले जाण्याची चिन्हे गडद होत आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर 2011मध्ये औरंगाबाद जिल्ह्याला 200  खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला (मिनी घाटी) मान्यता मिळाली आणि त्यासाठी 38 कोटी 31 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. चिकलठाणा परिसरात 2012मध्ये  रुग्णालयाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले, मात्र निधीअभावी रुग्णालयाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल चार वर्षे लागली. अपुर्या व खंडित स्वरुपात मिळालेल्या निधीमुळेच रुग्णालयाचे काम  अत्यंत संथ गतीने झाले. रुग्णालयातील वर्ग तीन व चारच्या 278 पदांना तीन मे 2016 रोजी दीर्घ प्रतीक्षेनंतर मंजुरी मिळाली, मात्र त्यानंतरही रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी  2017चे निम्मे वर्ष गेले. दरम्यान, हायकोर्टाने नोव्हेंबरअखेरपर्यंत रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्याच्या हालचाली  सुरू झाल्या आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ओपीडी’ सुरू करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी जाहीर केले. त्यानंतर मात्र आरोग्य मंत्री दिपक  सावंत यांनी हस्तक्षेप कऊश्‍न ‘ओपीडी’ सुरू करण्याचे नियोजन रद्द केले आणि पूर्णपणे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करण्याचे नव्याने आदेश दिले. या सर्व प्रशासकीय प्रक्रियांना लागणारा  वेग लक्षात घेता हे रूग्णालय सुरू होण्यासाठी पुढील वर्षातील काही महिने वाट पहावी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.