Breaking News

चोरीच्या गुन्ह्यातील फरारी चौघांना अटक, पावणे दोन लाखाचा ऐवज जप्त

सांगली, दि. 26, ऑक्टोबर - कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याकडील चोरीच्या गुन्ह्यात ङ्गरारी असलेल्या चौघांच्या टोळीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने अटक  केली आहे. या टोळीकडून दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने व 21 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह एकूण पावणे दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्यात रमेश शंकर नाईक (वय 26, रा. कलोती, ता. अथणी, कर्नाटक), विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील (वय 21, रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली), सतीश  शिवाजी कोळी (वय 27) व रोहित शिवाजी कोळी (वय 25, दोघेही रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) या चौघांचा समावेश आहे. या टोळीतील आणखी एकाचे नाव  निष्पन्न झाले असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगली जिल्ह्यातील फरारी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या अटकेचे आदेश स्थानिक गुन्हा  अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक कार्यरत झाले होते.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याकडील चोरीच्या गुन्ह्यात फरारी असलेले काही आरोपी नागज फा टा (ता. कवठेमहांकाळ) येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण  विभागाकडील पोलिस हवालदार उदय साळुंखे यांना मिळाली होती. या माहितीआधारे राजन माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, विजयकुमार पुजारी, सूर्यकांत  सावंत, उदय साळुंखे, सतिश आलदर, उदय काबुगडे व सचिन सूर्यवंशी यांच्या पोलिस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
या पोलिस पथकाने रमेश नाईक याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अन्य तिघा आरोपींचा ठावठिकाणा दिला. त्याच्या माहितीनुसार अन्य तिघांनाही अटक क रण्यात आली. या चौघांकडून दोन किलो 130 ग्रॅम 480 मिली वजनाचे चांदीचे दागिने, 21 ग्रॅम 820 मिली सोन्याचे दागिने, सोनारकानस, डायरी, अंगठी रॉड, चाकू व एक दुचाकी  असा पावणे दोन लाख रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.