Breaking News

पोलिसांचा अहवाल आल्यानंतरच धार्मिक स्थळांची यादी जाहीर करणार

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - धार्मिक स्थळांची यादी पोलिस अहवालानंतर ‘पोलिसांचा अहवाल आल्यावर धार्मिक स्थळांची अंतिम यादी महापालिका जाहीर करेल,’ अशी मा हिती पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली. धार्मिक स्थळांच्या संदर्भात प्राप्त झालेल्या आक्षेपांवर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मंगळवारी  सुनावणी झाली. यानंतर पत्रकारांच्या वतीने त्यांना माहिती विचारली असता आयुक्त म्हणाले, ‘ब वर्गात जेवढी धार्मिक स्थळे आहेत, त्या सर्वांचे वर्गीकरण केले आहे. या स्थळांबद्दल  पुन्हा एकदा पोलिसांचा अहवाल मागवला जाईल. धार्मिक स्थळांना असलेली लोकमान्यता, वाहतुकीसाठी निर्माण होणारा अडथळा याबद्दल पोलिसांचा अहवाल मागवला आहे. तो  आल्यावर धार्मिक स्थळांची अंतिम यादी तयार कऊश्‍न, ती कोर्टाला सादर केली जाईल. आज पंधरा ते वीस जणांनी सुनावणीसाठी हजेरी लावली, त्यांचे म्हणणे समितीने ऐकून  घेतले. आता यापुढे आक्षेपांवर सुनावणी घेतली जाणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे संघटक रेणुकादास (राजू) वैद्य म्हणाले,  ‘पालिका प्रशासनाने 1107 धार्मिक स्थळांची यादी तयार केली होती. आता यापैकी फक्त सात धार्मिक स्थळे पाडण्यात येतील. कोर्टाच्या आदेशाने महापालिका आयुक्तांनी धार्मिक  स्थळांवर कारवाई सुऊश् केली.