Breaking News

मराठा हायस्कूलच्या रसिका शिंदेची क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात निवड

नाशिक, दि. 28, ऑक्टोबर - मराठा विद्या प्रसारक समाज मराठा हायस्कूलची विद्यार्थीनी रसिका प्रदीप शिंदे हिची पुणे येथे होणार्‍या 17 वर्षा खालील राष्ट्रीय क्रीडा  स्पर्धेत निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या राज्य क्रिकेट स्पर्धा व निवड चाचणीमध्ये महाराष्ट्राच्या राज्य संघात तिची निवड झाली असून विदर्भात अकोला येथे तीन  दिवस होणा-या सराव शिबिरात ती सहभागी होणार आहे.
1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2017 दरम्यान ती खांडवा (मध्यप्रदेश) येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेईल. नाशिक विभागातून केवळ रसिका शिंदे हिचीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी  निवड झाली असून यापूर्वी देखील ती जम्मू-काश्मीर मध्ये राष्ट्रीय पातळीवर खेळून आलेली आहे. आतापर्यंत तिने अनेक राज्य पातळीवरील स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी  केलेली आहे. तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ..तुषार शेवाळे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.