Breaking News

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड

सांगली, दि. 28, ऑक्टोबर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या  वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय बेसबॉल (17 वर्षे मुले /मुली) क्रीडा स्पर्धा सन 2017-18 जिल्हा क्रीडा संकुल येथे 24 ते 26 ऑक्टोबर कालावधीत संपन्न  झाल्या. यावेळी निवड समिती सदस्य गोकूळ तांदळे, कौस्तुभ दळवी, नीरज जोशी यांनी राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी 17 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या  संघासाठी निवड केली. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांनी दिली.
चोरमले म्हणाले, निवड केलेले मुला-मुलींचे संघ राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी छत्तीसगड, दुर्ग येथे 7 ते 11 नोव्हेंबर 2017 या कालावधीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व  करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर हे 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे होणार  आहे.
जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे झालेल्या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे संपन्न झाल्या. स्पर्धेच्या निरोप समारंभ  प्रसंगी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर, सहसचिव प्रदिप खिलारे, खजिनदार अशोक सरोदे, कोल्हापूर विभागाचे समन्वयक ज्ञानेश काळे, जिल्हा  बेसबॉल असोसिएशनचे उदय गायकवाड व राजेंद्र कदम, जितेंद्र सोनवणे, देविदास राजपूत आदि उपस्थित होते.
राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड केलेला मुलांचा संघ पुढीलप्रमाणे. सौरभ गायकवाड, ऋत्वेज माने, अनुज पोळ व अजय पाटील (कोल्हापूर विभाग), रविराज  साळवे, गणेश गवळी (नाशिक विभाग), विकास राम व चिराग सोनवणे (मुंबई), धनंजय शिरसाट व रोहित शेळके (औरंगाबाद विभाग), प्रेम पटाडे, आदित्य चोरमले  व नवीन आदम (पुणे विभाग), निहाल भैसारे (नागपूर विभाग), ऋषिकेश घोंगडे (लातूर विभाग) व सोरभ गजभिये (अमरावती विभाग).
मुलींचा संघ पुढीलप्रमाणे-श्रध्दा पवार, राजेश्‍वरी बनसोड व ऋतुजा कदम (लातूर विभाग), वैष्णवी जाधव, सुजाता थोरवडे, अपिता तावरे व अदिती वाघमारे (कोल्हापूर  विभाग), मोहिनी गरड व कांचन कोरडे (पुणे विभाग), ईश्‍वरी शिंदे (औरंगाबाद विभाग), प्रगती निकाळे (नाशिक विभाग), मेलिसा फर्नांडिस, अदिती सरोदे व एवलि  पिटो (मुंबई), श्रावणी मानकर (अमरावती विभाग) व अदिती साखरे (नागपूर विभाग).