Breaking News

ठाणे जिल्हा अजिंक्य पद व निवड चाचणी मल्लखांब स्पर्धेत मो. ह. विद्यालयातील खेळाडूंचे यश

ठाणे, दि. 28, ऑक्टोबर - ठाणे जिल्हा अजिंक्य पद व निवड चाचणी मल्लखांब स्पर्धेमध्ये मो. ह. विद्यालयातील मल्लखांब संघाने प्रथमता सहभागी होऊन इयत्ता 4 थी  स्वराज्य ठाकरे (12 वर्षाखालील) इयत्ता 10 वी काजल वडवले (16 वर्षाखालील) इयत्ता 10 वी भावना यादव (16 वर्षाखालील) यांनी आपल्या संघासाठी  चांगली कामगिरी केली. हे खेळाडू 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी येथे होणार्‍या महाराष्ट्र अजिंक्य पद व निवड चाचणी मल्लखांब स्पर्धेमध्ये ठाणे जिल्हा संघाचे  प्रतिनिधत्व करणार आहे.
ठाणे जिल्हा अजिंक्य पद व निवड चाचणी मल्लखांब स्पर्धा पिपल एज्यूकेशन सोसायटी स्कूल कोपरी पूर्व ठाणे येथील पीइएसटी या शाळेच्या मैदानावर 24 ऑक्टोबर  रोजी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे जिल्हातील विविध भागातील ठाणे ग्रामीण,नवी मुंबई,कल्याण, डोंबिवली,ठाणे महानगर पालिका परिसरातील  शाळेमधून 50 मल्लखांब खेळाडूंनी भाग घेतला होता.