Breaking News

स्वरसंगमची दिवाळी पहाट गाणी संगमनेरचे सांस्कृतिक वैभव - आ. तांबे

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - मागील दहा वर्षापासून होणारा दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम संगमनेरचे सांस्कृतिक  वैभव आहे. संगमनेरकर दरवर्षी  मोठ्या उत्कंठेने या कार्यक्रमाची वाट बघत असतात असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. ते येथील स्वरसंगम संगीत प्रसारक मंडळ आणि  संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित पहाट गाणी कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. 
यावेळी कार्यक्रमाच्या निमंत्रक कांचन बाळासाहेब थोरात, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, धनश्री कैलास सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संतोष खेडलेकर यांची निर्मिती संकल्पना आणि निवेदन असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात झी संगीत सम्राट कार्यक्रमात गाजलेली गायिका सुरभी  कुलकर्णी हिच्या चल उठ रे मुकुंदा या भूपाळीने झाली.
सोपान भालके यांनी गायलेली आताच अमृताची बरसून रात्र गेली, बाजे रे मुरलिया बाजे, माझे माहेर पंढरी, खैके पान बनारसवाला ही गीते रसिकांची विशेष  दाद मिळवून गेली.
धर्मेंद्र अभंग यांनी गायलेल्या सुहाना सफर, खुदा भी आसमा से जाब जमि पार देखता होगा आणि सुरभी कुलकर्णी सोबत गायलेले जो वादा किया वो ही  गीतेही रसिकांनी डोक्यावर घेतली. सुरभी कुलकर्णी हिचे दिल चीज क्या है हे गीत वन्स मोअरची दाद मिळवणारे ठरले.  संगमनेरचे युवा संगीतकार  सत्यजित सराफ यांच्या संगीत संयोजनात झालेल्या या संगीत मैफलीत अजित गुंदेचा (तबला, ढोलक), राजकुमार सस्कर (बासरी आणि सनई), केदार  तांबोळी (हार्मोनियम, श्रीकांत गडकरी (साईड र्‍हिदम) आणि हरिप्रसाद सस्कर (बासरी) यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाला स्वरसंगमचे डॉ. अरविंद  रसाळ, संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.