Breaking News

श्रीरामपूरमध्ये ‘सुरांची दिवाळी व पहाट पाडवा’ कार्यक्रम

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - रोटरी क्लब श्रीरामपूर यांच्यावतीने शहरात प्रथमच सुरांची दिवाळी पहाट पाडवा या शास्त्रीय संगित तसेच मराठी  भावगित व भक्तीगितांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. 
आझाद मैदान येथे पाडव्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी पहाटे 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत करण्यात आलेल्या पहाट पाडवा या  कार्यक्रमाचे रोटरी क्लबसह सार्थक बहुउद्देशीय संस्था, गुडमॉर्निंग क्लब व गोदावरी टि सेंटर यांचे सहाय्य घेण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन  नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते तुळशीचे पुजन करुन करण्यात आले.
पहाट पाडवाचे चंदन परांजपे, सौ. सर्वेश्‍वरी परांजपे, कु. स्नेहल पोहेकर, आकाश गोंडे, धनंजय शिरसाठ, अवधुत कुलकर्णी, डॉ. किरण बडाख, डॉ. दिलीप  पडघन यांनी सुरेली शास्त्रीय संगित तसेच मराठी भावगिते गायली. यांच्या गायनाने मैफिल रंगली.
रोटरी क्लबने मरणोत्तर अवयवदान करण्याचे आवाहन यावेळी केले होते.
यास 22 जणांनी तत्काळ आपले अर्ज भरुन दिले. या उपक्रमासाठी रोटरीक्लब वर्षभर कार्यरत राहणार आहे.
प्रास्ताविक करतांना अध्यक्ष डॉ. सुरज थोरात म्हणाले की, श्रीरामपूर हे सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वैभवाला जावी यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमास सिध्दार्थ मुरकुटे, पंचायत समितीचे सदस्य सौ. वंदना मुरकुटे, अ‍ॅड. जयंत चौधरी, डॉ. रविंद्र कुटे, डॉ. भिटे, माजी प्राचार्य टि.ई. शेळके,  नगर एल.सी.बीचे शंकर चौधरी, हेडकॉन्टेबल रघुनाथ गोरे यांच्यासह रोटरीचे अध्यक्ष डॉ. सुरज थोरात, सचिव विनोद पाटणी, इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा  सौ. ज्योत्सना तांबे, कामगार हॉस्पीटलचे मुख्य विश्‍वस्थ अविनाश आपटे, नॅबचे अध्यक्ष अ‍ॅड. भागचंद चुडीवाल, मुकबधिर विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश  बनकर, अनिल मुळे शाळेचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, रोटरीचे माजी अध्यक्ष छबुकाका गिरमे, भाऊसाहेब मोरे, अनिल पांडे, राजेश कुंदे, जितेंद अग्रवाल,  विशाल फोपळे, गणेश देशपांडे, उल्हास धुमाळ, डॉ. रविंद्र कवडे, शकिल बागवान, शिरीष सुर्यवंशी, उमेश तांबडे, सचिन भांड, नाना नागले यांच्यासह  शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.