Breaking News

शिवसंग्रामच्या इशार्‍याने शहरातील भारनियमन बंद!

बुलडाणा, दि. 12, सप्टेंबर - देऊळगांव राजा शहरात भाग दोन मध्ये सुरु असलेले विजेचे अकस्मित भारनियमन शिवसंग्राम संघटनेने रास्ता रोको अंदोलनाचा इशारा देताच सदर भारनियमन  तात्काळ बंद करण्यात आले आहे.तसे लेखी पत्राद्वारे शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांना महावितरणाचे उपविभागीय अभियंता कायंदे यांनी कळविले आहे.
देऊळगांव राजा शहरात भाग दोन मध्ये पिंपलनेर, माळीपुरा, त्रिम्बक नगर, आदर्श कॉलनी,भगवान बाबा नगर, सम्राट कॉलनी, यासह इतर ठिकाणी गत काही दिवसा पासून आकस्मित  भारणीयमन सुरु होते.विज ग्राहकांची काहीही चूक नसताना त्याना भारनियमनाचा त्रास सोसावा लागत होता.अर्धे शहर प्रकाशमय तर अर्धे शहर अंधारलेले दिसत होते.यामुळे विज ग्रहक ांमध्ये विज वितरण कंपनी विरुद्ध रोष निर्माण झाला होता.त्यातच शहरातील बालाजी महाराजांच्या यात्रा महोत्सवाला सुरवात झाली आहे.सोबत दीवाली हा मोठा सण व विद्यर्थाचे परिक्षेचे  दिवस सुरु झाले.आशा परिस्थितित शहरात भारनियमन सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता.
त्या अनुष्यंगाने शिवसंग्राम संघटनेने शहरात सुरु असलेले अकस्मित भारनियमन तात्काळ बंद करा,अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अभियंता श्री कायंदे  यांना दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दिले होते.सदर निवेदनाची महावितरण कंपनीने दखल घेऊन शहरात सुरु असलेले भारनियमन बंद केले.शहरात वीजपुरवठा सुरळीत सुरु केला आहे.तसे लेखी  पत्रा द्वारे महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता श्री कायंदे यांनी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांना कळविले आहे.त्यामुळे शिवसंग्राम चे रास्ता रोको आंदोलन मागे  घेण्यात आले आहे.शहरात विज पुरवठा सुरळीत झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानकारक वातावरण असून शिवसंग्राम संघटनेचे कौतुक होत आहे.