Breaking News

वीजेच्या खांबावर चढुन विजवाहिनीला स्पर्श करून आत्महत्या

नांदेड, दि. 04, ऑक्टोबर - नायगाव बाजार तालुक्यातील कोलंबी येथील महाजन गणपत शिंदे ( वय 52 ) या कर्जबाजारी शेतकर्‍याने सर्वांसमक्ष वीजेच्या खांबावर  चढुन विजवाहिनीला स्पर्श करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली . शिंदे यांच्या घरी जमिनीची वाटणी झाली त्या बरोबर शेतीवरचे कर्जही  त्यांच्या भावामध्ये आीण त्यांच्यात वाटले गेले.मात्र ते कसे फेडणार या विवंचनेतून त्यांनी हा अघोरी प्रकार करून स्वत:ला संपविले.