Breaking News

राष्ट्रीय फुटबॉल संघांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी औरंगाबादची निवड

औरंगाबाद, दि. 04, ऑक्टोबर - राष्ट्रीय फुटबॉल संघांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी औरंगाबादची निवड करण्यात आली आहे . या घोषणेने औरंगाबाद नव्हे तर संपूर्ण  मराठवाडयाच्या क्रिडा क्षेत्रातही आनंदाचे वातावरण पसले आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी औरंगाबाद आणि कोलकाता या दोन  ठिकाणांची निवड करण्यात आल्याची घोषणा केली. औरंगाबादेतील ’साई’च्या जागेत हे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र उभे राहणार आहे. मुंबई जिल्हा फुटबॉल  असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून या घोषणे बददल समाधान व्यक्त केल्याचे समजले.