Breaking News

कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या बड्या नेत्यांना अटक

कल्याण, दि. 23, ऑक्टोबर - फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कल्याणात  प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे.
डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या  एकूण 12 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, मनसे कार्यकर्ते स्वतःहून महात्मा फुले चौक आणि रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाले.