Breaking News

रिंकूच्या नव्या सिनेमाची घोषणा!

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - आर्चीचा सैराट अंदाज लवकरच नव्याने अनुभवता येणार आहे. ब्लॉकबस्टर ‘सैराट’मधून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरु आणखी एका सिनेमातून  रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. ‘रिंगण’फेम मकरंद मानेने त्याच्या नव्या सिनेमासाठी रिंकूची निवड केली आहे. गंमत म्हणजे मकरंद आणि रिंकू या दोघांनाही एकाच वर्षी राष्ट्रीय  पुरस्कार मिळाला होता.
‘रिंगण’ सिनेमातून मकरंदमधला संवेदनशील दिग्दर्शक दिसला तर ‘सैराट’मधून रिंकूमधली अभिनेत्री समोर आली. त्यामुळे आता या दोघांची एकत्रित कलाकृती कशी असेल याची  उत्सुकता नक्कीच वाढली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. परंतु या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. ‘उदाहरणार्थ निर्मित’चे सुधीर  कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे.