Breaking News

आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्याचा युवा संघ हरियाणाला रवाना

मुंबई, दि. 26, ऑक्टोबर - हरियाणाची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या करनाल येथे 29 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश व 12 देशांतील साडेपाच हजार युवा प्रतिनिधी  आणि कलाकार आंतरराष्ट्रीय युवा हार्मोनी महोत्सवासाठी एकत्र येणार आहेत. प्रितपाल सिंह पन्नु अध्यक्ष असलेल्या ॠनॅशनल इंटिग्रेटेड फोरम फॉर आर्टिस्ट अँड अ‍ॅक्टिव्हिस्ट’ या  संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात ॠविविधतेत एकता - भारताची विशेषता’ दाखविण्यात येणार आहे. यासाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यपाल  व केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवासाठी राज्यातून डॉ. भरत जेठवानी यांच्या मार्गदर्शनाखाली ॠटीम महाराष्ट्रा’ सांस्कृतिक राजधानी पुण्यावरून रवाना झाली. राज्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते, कलाक ार, राष्ट्रीय व राज्य युवा पुरस्कार्थी अशा 200 युवक, युवतींचा समावेश या संघात आहे. यांचे नेतृत्व ॠयुवान फाऊंडेशन’चे सदस्य सौरभ नावंदे करत आहेत. देश विदेशातून  आलेले युवक आपापल्या राज्यातील, देशातील परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन या महोत्सवात घडवणार आहेत. यात राज्याची लोकधारा व संस्कृतीचे दर्शन राज्याचे कलाकार जगाला  घडवणार आहे. या महोत्सवात डिजीटल इंडिया, भ्रष्टाचाराविरूद्ध लढा, युवकांचे राजकारणातील योगदान, स्कील इंडिया- स्मॉल स्केल टू एमएनसी, स्वच्छ भारत अभियान, लिंग  समानता, महिला सशक्तीकरण, व्यसनमुक्ती, दहशतवाद विरोधी लढा, अपंग व्यक्ती तसेच लहान मुलांची आव्हाने व समस्या यांवर चर्चा करताना राज्यातील युवा सामजिक कार्यकर्ते  दिसणार आहेत.