भावकीतला चांगूलपणा हरला, भाऊबंदकी माञ जिंकली....!
दि. 16, आक्टोबर - मराठी माणूस खेकड्याच्या जातीचा आहे,असे वारंवार हिनवून मराठी अस्मितेला डंख मारण्याचे काम सातत्याने सुरू आहे,अर्थात या डंख मारीला मराठी माणूस स्वतःच जबाबदार आहे हे प्रत्येकवेळी स्पष्ट झालेच आहे.मुंबईत घडलेल्या छक्के पंजाच्या त्या कहानीतही मराठी माणसातील खेकडा प्रवृत्तीच खलनायक ठरली आहे.या नाट्यछटेत नायक ,खलनायक,रंगमंच,नेपथ्य,प्रकाशव्यवस्था,इतकच नाही तर कथानकही मराठमोळ आहे.महाराष्ट्रात राहणारे सारे मराठी या न्यायाने मनसेच्या वाट्याला आलेल्या या शोकांतिकेला कुठलाही पक्ष कारणीभूत ठरला असता तर कदाचित मराठीने मराठीचा गळा घोटला असे म्हणणे तेव्हढे संयूक्तिक ठरले नसते.माञ इथे भावाने भावाचे घर फोडण्याचा प्रमाद केला आहे,तोही ज्या भावाने यापुर्वी अनेकदा मनपाच्या राजकीय आघाड्यावर या भावाची इभ्रत वाचवली,त्याच भावाच्या घरावर दरोडा टाकण्याचे धाडस करून भाऊबंदकीतील आदर्श संकेतांना,बाळासाहेबांच्या संस्कारांना आणि त्याही पेक्षा महाराष्ट्राच्या साधनशुचिता जपणार्या राजकीय परंपरेला कलंकीत केले आहे.म्हणूनच मराठी माणूस खेकडा आहे यावर शिक्कामोर्तब करणारं हे वर्तन सदैव निषेधार्हच म्हणावं लागेल.
प्रेम आणि युध्दापाठोपाठ राजकारणातही सर्व काही माफ असते असे मानण्याची प्रथा आहे.सत्तेचे समीकरण जुळवितांना आपले संख्याबळ जुळविण्यासाठी पर पक्षातील काठावरच्या पाखरांना दाने टाकून आपल्या पिंजर्यात अडकविण्याची प्रथाही तशी जूनी झाली आहे.या पातळीवर विचार केला तर मुंबईत वाढत असलेला भाजपाचा दबदबा रोखण्यासाठी शिवसेनेने स्वतःची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे.त्यासाठी इतर पक्षांची मंडळी वेगवेगळी अमिष दाखवून आपल्या बाजूला खेचण्यातही आजच्या नीतीशुन्य राजकारणात निषिध्द नाही.पण अशा प्रकारची भुमिका घेतांना आपण कुणाचे घर फोडायला निघालो आहोत याचे भान माञ पक्ष प्रमुखांनी ठेवायला हवे होते. शिवसेना आणि मनसे किंवा उध्दव आणि राज यांच्यात महाराष्ट्र विशेषतः तरूणाई जेंव्हा तुलना करते तेंव्हा बहूमत राज ठाकरे यांच्या बाजूला झुकतांना दिसते.स्व.बाळासाहेब ठाकरे यांची शरीरयष्टी,लकब ,देहबोली,वक्तृत्व शैली इतकेच नाहीतर राजकारणात हवी असलेली भुमिका या सार्या गोष्टी बाळासाहेबांशी नजिकचं साधर्म्य सांगतात.तुलनेत ऊध्दवकडे बाळासाहेबांचा वारस याव्यतिरिक्त या पैकी एकही जमेची बाजू नाही.बाळासाहेबांकडे असालेला करारीपणाही उध्दवकडे नाही,उलट राजकारणातील प्रासंगीक कडवटपणा जो बाळासाहेबांमध्ये होता तो राज ठाकरेंमध्ये ठासून भरला आहे.
आपले राजकीय उद्दिष्ट निश्चित करून कितीही अडथळे आले,खाच खळगे आले तरी ते पार करून प्रसंगी एकला चलो रे च्या भुमिकेत चालत राहणे ही बाळासाहेबांची भुमिका होती.सत्तेच्या लोभाने या भुमिकेशी,उद्दिष्टांशी बाळासाहेबांनी कधी तडजोड केली नाही.कुणाच्या बेंबीत स्वतःहून बोट घालून गुदगुदल्या करण्याचा आततायीपणाही बाळासाहेबांनी कधी केला नाही,तोच करारी बाणा घेऊन राज ठाकरे आपली राजकीय वाटचाल करीत असतांना अचानक उध्दव ठाकरे यांना सुचलेल्या उपरतीने राज ठाकरेंचा स्वाभीमान दुखावणे स्वाभावीक होते.या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे एव्हढा मोठा आघात सहन करूनही राज ठाकरे यांनी दाखवलेला संयंम,बौध्दिक आणि मानसिक परिपक्वता कसलेल्या राजकारण्यालाही लाजविण्यासारखी आहे.मुंबई मनपात अवघे सात नगरसेवकांमधून सहा नगरसेवक फोडून शिवसेनेने नक्की काय पदरात पाडून घेतले ? या प्रश्नाचे उत्तर खरे तर शिवसेनेच्या फायद्याच्या दृष्टीने काहीच नाही असेच आहे.राजकारणाच्या बाजारात स्वतःला विकणारे वेश्यी प्रवृत्तीचे राजकारणी आपली बोली लावून उभे असतात,तासे शिवसेनेतही आहेत आणि खरेदीच्या कुवतीचा विचार केला तर शिवसेनेच्या तुलनेत भाजपा हा कसलेला भांडवलदार व्यापारी आहे,चर्चेत असल्याप्रमाणे प्रत्येकी पाच या प्रमाणे सहा जणांवर तीस कोटींचा जुगार खेळलेल्या शिवसेनेला धोबीपछाड देण्याची ताकद भाजपात नक्की आहे.रवीवारच्या सकाळी आशिष शेलार यांची कृष्णकुंंज राज ठाकरे यांची भेट झाल्या नंतर झालेली राज ठाकरे यांची पञकार परिषद,त्या पञकार परिषदेतील राज ठाकरे यांची देहबोली नजिकच्या भविष्यात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागणार असा गर्भित इशारा देणारी होती .शिवसेनेकडून ऑ अशी अपेक्षा नव्हती, मदत मागीतली असती तर स्वतःहून दिली असती,हा प्रकार कधीही विसरणार नाही,यापुर्वीही मदत केली आहे,राज ठाकरे यांचे हे वक्तव्य सहा नगरसेवकांच्या गद्दारीने निर्माण झालेल्या हतबलतेची अगतिकता नव्हती तर मुल्य घसरलेल्या राजकारणातही नितीमत्तेचं राजकारण करण्याचा बाळासाहेबांचा वसा सोडलेला नाही आणि सोडणारही नाही हे आत्मविश्वासपुर्वक सांगण्याचा तो दृढ संकल्प होता.असो.पुन्हा इथेही भावकीतला चांगूलपणा हरला,भाऊबंदकी माञ जिंकली.