Breaking News

शहीद मिलिंद खैरनार यांच्यावर मूळगावी सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

नंदुरबार, दि. 12, ऑक्टोबर - जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झालेले मिलिंद किशोर खैरनार यांचे पार्थिव वायुसेनेच्या विमानाने ओझर येथे आणण्यात आले आहे.  यावेळी लष्करी इतमामात वायुसेनेच्या अधिकार्यांकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलिस अधीक्षक संजय दराडे, शहीद जवानाचे बंधू मनोज खैरनार  यांच्याकडून शासकीय मानवंदना देण्यात आली.
दरम्यान, आज, गुरुवारी सायंकाळी मिलिंद यांचे पार्थिव मूळ गावी बोराळे येथे आणण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार तापी नदीकाठी असलेल्या जागेत करण्यात येणार आहेत. प्रशासकीय अ धिकारी गावात ठाण मांडून आहेत.
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी अतिरेक्यांविरुद्ध चकमकीत वायुदलाचे 2 गरुड कमांडो शहीद झाले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील बोराळे येथील सार्जेंट मिलिंद ऊर्फ रिंकू किशोर खैरनार  (33) यांच्यासह नीलेशकुमार यांना वीरमरण आले. दोन्ही अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. काश्मिरात 27 वर्षांत अतिरेक्यांविरुद्ध कारवाईत प्रथमच वायुदलाचे जवान शहीद झाले  आहेत. याआधी 2 जानेवारी 2016 रोजी पठाणकोट हवाई तळावरील अतिरेकी हल्ल्यात एक गरुड कमांडो शहीद झाला होता.