Breaking News

ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते यांचे निधन

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर - ज्येष्ठ लेखिका इंदूमती थत्ते यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी इंदूमती थत्ते यांनी अखेरचा श्‍वास घेतला. इंदूमती यांच्या पश्‍चात 3 मुले आहेत. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांच्या त्या मातोश्री होत्या. इंदूमती यांचे ’अरे संसार संसार’ हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचकांच्या विशेष पसंतीत उतरले होते. इंदूमती यांच्या निधनाबाबत मराठी साहित्य वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.