Breaking News

नागपुरात जुगारी नगरसेवकाला अटक

नागपूर, दि. 23, ऑक्टोबर - नागपुरातील वॉर्ड क्र.20 येथील काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांना आज, रविवारी पोलिसांनी जुगार खेळताना अटक केली. विशेष म्हणजे पुणेकर  यांना  2012 मध्ये देखील याच आरोपात अटक करण्यात आली होती.
यासंदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पोलिसांना त्यांच्या खबर्‍याने नागपुरातील मोतीबाग परिसरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर पाचपावली पो लिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता काँग्रेसचे नगरसेवक पुणेकर आणि शहरातील 20 प्रतिष्ठित व्यापारी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी का ँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर आणि 20 व्यापार्‍यांना अटक केली असून 3 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला. या प्रकरणामुळे शहर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली  आहे.
विशेष म्हणजे रमेश पुणेकर यांना यापूर्वी 2012 साली जगनाथ बुधवारी परिसरात जुगार खेळताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्यांनी आपण घटनास्थळी मित्राला भेटण्यासाठी  आल्याचे सांगितले होते. रमेश पुणेकर हे काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांच्या गटातील असून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.