पोलीस ठाण्यातून वाळू तस्करांनी पळवला वाळूचा ट्रक
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - पोलिसांनी पकडलेला बेकायदा वाळूने भरलेला हायवा ट्रक चक्क पोलिस ठाण्यातून वाळू तस्करांनी पळवून नेल्याची घटना शहागड येथे घडली.
या बाबत सविस्तर माहिती अशी की कुरण गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करत असलेला हायवा टिप्पर ( एमएच-46 एफ.2360 ) पोलिसांनी पकडला होता मात्र त्या बाबत महसुल विभागाकडून काही तांत्रिक कारवाई करणे बाकी राहिले होते म्हणून तो ट्रक शहागड पोलिस चौकीच्या आवारात लावला असताना चौघांनी मध्यरात्र ते सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान तो ट्रक पळवला. या बाबत पोलिसांनी पंक ज सोळूंके, ज्ञानेश्वर तांगडे, हनुमान गिरी, सुनील बोंबले (रा.सर्व गोंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.