जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे मंजूर आराखड्यानुसार पूर्ण करावीत
सातारा, दि. 11, ऑक्टोबर - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली कामे मंजूर आराखड्यानुसार तंत्रशुद्ध, दर्जेदार व वेळेत पूर्ण क रावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यानी आज केले. येथील नियोजन भवनात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मिशन वॉटर कॉन्झर्व्हेशन या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, प्रशिक्षक समन्वय प्रदीप पाटणकर आदी यावेळी उपस्थित होते.
मृद व जल संधारणाची कामे चांगल्या पद्धतीने करावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 100 टक्के जॉबकार्ड वितरण करणे आवश्यक आहे. सातारा जिल्हयाचे जिओ टॅगिंगचे कामकाजातही सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जल व मृद संधारणाची कामे करीत असताना रोहयाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, मनरेगा, जलयुक्त शिवार अभियान आणि एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन विभागांनी एकत्र येवून नियोजनपूर्ण आराखडा तयार करावा व त्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे जलमृदा संधारणातून जल व माती संवर्धन करुन पाण्याचा वापरासाठी सुनियोजित प्रयत्न करावेत. तसेच पाण्याच्या ताळेबंदावर आधारित जलनियोजन करावे, त्यामध्ये प्राधान्याने सुक्ष्म सिचंन सुविधा सिंचनाचे विविध उपययोजना व संसधानांची निर्मिती, जुनी संसाधने बळकट व दुरुस्ती करणे यांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यशाळेत दत्ता सेवा समितीच्या पदाधिकार्यांनी विविध जिल्ह्यात करत असलेल्या कामांविषयी माहिती दिली.
या कार्यशाळेस तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.