वाहतुकदारांच्या देशव्यापी संपाला लातूर जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद
लातूर, दि. 11, ऑक्टोबर - वाहतुकदारांच्या देशव्यापी संपाला लातूर जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व ट ्रान्सपोर्टचालकांची एक संघटना ट्रान्सपोर्ट असोशिएशन या नावाने चालते. या संघटनेच्या आवाहनानुसार सर्व चालकांनी आपापली वाहने जमेल त्या ठिकाणी लावली अहेत. लातुरात राजीव गांधी चौक ते बाभळगाव नाका या मार्गावर हजारो ट्रक उभे असलेले दिसतात. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने जीएसटी आणि डिझेलच्या भाववाढीविरोधात हा पवित्रा घेतला. देशभर आवाहन करण्यात आले. यामुळे आम्ही या बंदमध्ये सहभागी झालो. डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले, टोल वसुलीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे सारेच परवडण्याजोगे नाही अशी माहिती ट्रान्सपोर्ट असोशिएशनचे अध्यक्ष सत्यनारायण पारीख आणि सदस्य व्यंकटराव भालके यांनी आजलातुरला दिली. यावेळी रसूलखान पठाण, मुख्तार शेख, सतीश पेद्दे, संदीप पाटीलही उपस्थित होते.