शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. भारतकुमार सोनवणे
औरंगाबाद, दि. 11, ऑक्टोबर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधीक्षकपदी डॉ. भारतकुमार सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी डॉ. सुधीर चौधरी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. या वेळी ’घाटी’तील अधिकारी व क र्मचा-यांनी डॉ. सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. सुधीर चौधरी हे शरीरक्रिया शास्त्र विभागाचे असून त्यांनी अधीक्षक पदाचा पदभार अडीच वर्षांपूर्वी स्वीकारला होता. कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्याला पदापासून मुक्त करण्यात यावे अशी मागणी अधिष्ठातांकडे केली होती. डॉ. भारतकुमार सोनवणे हे बाह्य रूग्ण प्रयोग शाळेचे प्रमुख असून त्यांना प्रशासकीय कामाचा चांगलाच अनुभव आहे.