Breaking News

बेलापूरमध्येे ‘एक पणती जवानां’साठी उपक्रम

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - फ्रेंड्स फाँर एव्हर गृप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जवानासाठी एक पणती जवानासाठी हा उपक्रम राबविण्यात  आला .पोलीस दलातील कर्मचारी सैनिक माजी सैनिक  यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
सायंकाळी बेलापूरच्या मुख्य झेंडा  चौकात फ्रेंड्स फाँर एव्हर गृपचे कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी    असंख्य  नागरिक  जमा झाले .नागरिकांनी  सोबत आणलेल्या पणत्या  झेंडा  चौकात लावल्या .त्यानंतर काही वेळासाठी विज बंद करण्यात आली .दिव्यांच्या प्रकाशात सारा परिसर उजळून निघाला  .या वेळी शहीद जवान अमर रहे जय जावान जय किसान भारत माता की जय वंदे मातरम  या घोषणानी परिसर दुमदुमुन गेला .
या कार्यक्रमास सरपंच  भरत साळूंके  फ्रेंड्स फाँर एव्हर गृपचे अभिषेक खंडागळे  गोपाल जोशी, मयुर साळुंके, राजेश सुर्यवंशी, शशीकांत तेलोरे, प्रशांत  मुंडलीक, साईनाथ शिरसाठ, प्रभात कुर्हे, जायेन्द्र खटोड, विष्णूकांत लखोटीया, संदीप जाधव, प्रविण कुर्हे, दिनेश वाघ, मुकुंद पटेल, माजी सैनिक  सुभाष  नगरकर, शरद देशपांडे, देविदास  देसाई, जि. प सदस्य शरद नवले, बाजार समितीचे  संचालक सुधीर नवले, सुनिल नवले, दिलीप दायमा प्रा. ज्ञानेश  गवले, कै.मुरलीधर खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविन्द्र  खटोड, अरुण पाटील नाईक, विलास मेहेत्रे प्रशांत लड्डा, बेलापूर पोलीस स्टेशनचे पपोलीस नाईक  गणेश भिंगारदे अतुल लोटके, अर्जुन  पोकळे राहुल सोळूंके महावितरणचे चेतन जाधवा मधुकर औचिते प्रसाद खरात आदिसह अनेक कार्यकर्ते नागरिक  उपस्थित  होते.