Breaking News

ग्रामपंचायतीने दिली गरीब विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायतकडून दारिद्र्य रेषेखालील इ. 5 वी ते 10 वीपर्यंतच्या 25 गरीब  विद्यार्थ्यांना दिवाळीची भेट म्हणून दिवाळी पाडव्याला 500/- रुपयांच्या धनादेशाचे सरपंच सुनंदा जाधव, संचालक आबासाहेब गवारे, दत्तात्रय गवारे,  बबनराव गवारे, प्रकाशराव गवारे, भास्करराव ताके, गोरक्षनाथ गवारे, प्रवीण गवारे, नितीन गवारे आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सिद्धांत यादव, स्वप्नील मोरे, अनुराधा जाधव, वैभव जाधव, सनी मोरे, ओम मोरे, कार्तिक माळी, मोहिनी मोरे, पूजा यादव, प्रार्थना बोंबले, विष्णू  जाधव, विनीत गवारे, तेजस आधुडे, सुरज गवारे, शुभम माळी, पल्लवी बहिरे, वैष्णवी गवारे, अनिता त्रिभुवन, करण त्रिभुवन, गणेश जाधव, प्रसाद बोंबले,  साक्षी गवारे, प्रियांका यादव, मनीषा यादव, सरस्वती मोरे या 25 विद्यार्थ्यांना करण्यात आले. ग्रामपंचायत शिरसगावच्या माध्यमातून विविध सामाजिक,  शैक्षणिक, उपक्रम राबवित असल्याचे व विकासकामासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे अशोक कारखाना संचालक आबासाहेब गवारे यांनी यावेळी सांगितले.  गावातील परिसरातील हौशी कबड्डीपट्टूसाठी हरिगाव फाटा येथे विश्‍व क्लबच्यावतीने सरावासाठी केलेल्या मैदानाचाही शुभारंभ भास्करराव ताके, आबासाहेब  गवारे, बबनराव गवारे, यादव आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.