Breaking News

ऊस नेणार्‍या ट्रॅक्टरची ’स्वाभिमानी’कडून तोडफोड

कोल्हापूर, दि. 28, ऑक्टोबर - हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीची कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या  मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली.
कागल येथील संताजी घोरपडे कारखान्याची ऊसवाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची परिते येथे तोडफोड करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं गाडीची हवा सोडली. हा कारखाना माजी मंत्री  हसन मुश्रीफ यांच्या मालकीचा आहे. आक्रमक झालेल्या स्वाभिमानीनं या कारखान्याची ऊस वाहतूक बंद पाडली आहे. 16 वी ऊस परिषद कोल्हापूरमध्ये सुरु होत आहे. त्या  पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.