Breaking News

छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा मदन पाटील युवा मंचकडून पंचनामा

सांगली, दि. 06, ऑक्टोबर - सांगली शहरातील खेळाडूंसाठी एकमेव असलेल्या श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या दुरावस्थेचा मदन पाटील युवा मंचचे सांगली  महापालिका क्षेत्र अध्यक्ष शीतल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्त्यांनी गुरूवारी पंचनामा केला. या क्रीडांगणासह परिसरात निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य दूर  करीत सांगली महापालिका प्रशासनाने जबाबदारी ओळखून या क्रीडांगणाची वेळीच देखभाल दुरूस्ती करावी. अन्यथा, मदन पाटील युवा मंचच्यावतीने तीव्र आंदोलन  उभारावे लागेल, असा इशारा शीतल लोंढे यांनी दिला.
श्री छत्रपती शिवाजी क्रीडांगण व परिसरातील दुरावस्थेबाबत मदन पाटील युवा मंचकडे मोठ्याप्रमाणात तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शीतल लोंढे  यांच्यासह मदन पाटील युवा मंचचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आनंदा लेंगरे व सचिव प्रविण उर्ङ्ग लिंगाप्पा निकम आदी प्रमुख पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी गुरूवारी  सकाळी क्रीडांगण परिसराला भेट दिली. त्यावेळी क्रीडांगणावर सराव करणार्या खेळाडू व सकाळच्या सत्रात व्यायामासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी या क्रीडांगणाच्या  दुरावस्थेबाबत मदन पाटील युवा मंचकडे गार्हाणी मांडली.
सांगली शहरातील खेळाडूंसाठी एकमेव असलेल्या या क्रीडांगणावरील हिरवळ सध्या पूर्णपणे नष्ट झालेली आढळली. अनेक ठिकाणी गवताचे कुसळे उगवलेले व उत्तर  बाजूला पावसाचे पाणी साचलेले होते. या क्रीडांगणावरील ओल लवकर सुकत नाही, त्या जागी गटारीचे पाणी सतत येत असून कमरेइतके गवत वाढले होते. या मुख्य  क्रीडांगणाची अत्यंत इतकी वाईट दुर्दशा पाहतानाच परिसरातील अनेक भागात दारूच्या बाटल्या व प्लास्टिक कचरा आढळला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या या क्रीडांगणाची झालेली दुरावस्था पाहून थबकलेल्या मदन पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ स्वच्छता  मोहिमेलाच सुरूवात केली. त्याला क्रीडांगणावर उपस्थित खेळाडू व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठा हातभार लावला. मदन पाटील युवा मंचच्या पुढाकाराने सुरू झालेल्या  या क्रीडांगण स्वच्छता मोहिमेत तब्बल चार तासाहूनही अधिक काळ शेकडो हात राबले. त्यात अमित लालगे, तौङ्गिक शिकलगार, राहूल नवलाई, आशिष तरला,  अमोल डांगे, दिलीप जाधव, निखिल पाटील, विनायक माळी, दिनेश सादिलगे, मयूर पाटील व अक्षय दोड्डमणी आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.