Breaking News

दिवाळीनंतर परतणा-या प्रवाशांसाठी रविवारी रत्नागिरी-पनवेल विशेष रेल्वे

पनवेल, दि. 22, ऑक्टोबर - दिवाळीनिमित्त कोकणातून परतणा-या चाकरमान्यांसाठी रत्नागिरी ते पनवेल दरम्यान उद्या 22 ऑक्टोबर रोजी अनारक्षित  विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी-पनवेल-रत्नागिरी  अशी जनसाधारण विशेष गाडी आहे. या गाडीला संगमेश्‍वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव व रोहा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
या गाडीचा तपशील : 00504 जनसाधारण विशेष गाडी  (रविवार) रत्नागिरी स्थानकातून दुपारी 1 वाजता निघेल आणि सायंकाळी 7.50 वाजता  पनवेलला पोहोचेल. 00503 क्रमांकाची गाडी रात्री 8.20 वाजता पनवेल स्थानकातून निघेल आणि पहाटे 3 वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.