Breaking News

काकडे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तीमत्व - प्रा. भिसे

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - दीन, दलित, उपेक्षित समाजाचे तर कष्टकरी शेतकर्‍यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणणारे आपल्या वकिली पेशातून सर्वसामान्यांना  न्याय देणारे आणि स्वातंत्र्यानंतर सावकारी जोखाडात अडकलेल्या समाजाला सोडवणारे कुठलीही राजकीय शक्ती अथवा आर्थिक पाठबळ पाठीशी नसताना आपल्या कार्य कर्तुत्वाच्या  जोरावर जनमाणसाच्या मनावर ठसा उमटवणारे कॉम्रेड आबासाहेब काकडे एक सामाजिक बांधिलकी जपणारे अद्वितीय व्यक्तिमत्व होते असे प्रतिपादन शहरटाकळी विद्यालयाचे  प्राध्यापक गोरक्ष भिसे यांनी केले. शहरटाकळी येथील काकडे विद्यालयात कै आबासाहेब काकडे यांच्या 39 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रा भिसे  बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहरटाकळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष अनिलराव मडके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, तालुका  खरेदी विक्री संघ संचालक बाळासाहेब जाधव, समाज प्रबोधनकार हमीद सय्यद, प्राचार्य राजेंद्र मगर, भाऊसाहेब मडके, राजू वैद्य, प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र  मडके आदी उपस्थित होते. सर्वसामान्य जनता शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्यासाठी ज्ञानमंदिर समजल्या जाणार्‍या शाळेची अनेक गावात स्थापना केली त्यातून  एक साक्षर आणि सक्षम पिढी घडवण्याचे काम कॉम्रेड आबासाहेबांनी केले, म्हणूनच गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असे मत समाजप्रबोधनकार हमीद सय्यद  यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या भारुड कलेतून यांनी स्वच्छतेचा संदेश देत काकडे यांच्या कार्यकर्तुत्वाचे महत्व आपल्या कलेतून सदर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाय. डी. क ोल्हे, अनिल मडके यांचीही यावेळी भाषणे झाली. आबासाहेब काकडे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेऊन आपणही आपल्या समाजाप्रती काही देन लागतो  हे ओळखावे व आपल्या हातून देशहिताचे समाजकार्य घडावे असे आपल्या प्रास्ताविक भाषणात पर्यवेक्षक श्री धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी संदीप राउत, सुनील गवळी, अशोक थोरात, शंकर मरकड, दीपक कणके, गुरुनाथ माळवदे, शंकर गोसावी आदींसह विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. क ार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुरेश तेलोरे यांनी केले तर आभार प्राचार्य राजेंद्र मगर यांनी मानले.