Breaking News

दिवाळीनिमित्त औरंगाबाद शहरात ऑपरेशन ऑल आऊट

औरंगाबाद, दि. 19, ऑक्टोबर - शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने ऑपरेशन ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली. नाकाबंदी दरम्यान संशयित वाहनांसह  ढाबे, मॉल यासह इतर महत्त्वाच्या स्थळांची तपासणी करण्यात आली. या वेळी दोषी व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकाने 1 हजार 881 वाहनांची तपासणी  करत 178 केसेस करून 51 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी 3 दारूच्या केसेस करून 4 आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने शहाबझार  शबाना हॉस्पिटलजवळ गुप्त माहितीवरून जुगार खेळताना सहा इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन सिटीचौक येथे कारवाई करण्यात आली. या वेळी शहरातील 80 हॉटेल, लॉजची तपासणी  करण्यात आली.