Breaking News

’एचएएल’ला 2050 पर्यंत पुरेल इतके काम ; भामरे यांची ग्वाही

नाशिक, दि. 19, ऑक्टोबर - सुखोई विमानांची समग्र तपासणी व दुरूस्ती ही कायमस्वरूपी राहणार आहे. तसेच पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या निमिर्तीचे काम ’एचएल’  लाच देण्याचे त्यातही नाशिक विभागालाच देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे एचएएल कंपनीला 2050 पर्यंत काम उपलब्ध होणार असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री सुभाष  भामरे यांनी येथे दिली.
शेतकरी कर्जमाफीचे वाटप कार्यक्रमाप्रसंगी नाशिक येथे दाखल झाले असता भामरे पत्रकार परिषदेत बोलत होते. भामरे म्हणाले, नाशिक एचएलमध्ये वर्षाला 12 विमाने होतात.  त्यांची समग्र तपासणी व दुरूस्ती आता सुधारणा करून वर्षाला 30 विमानांचे करण्याचा प्रयत्न आहे असे असेल तर हे पुढील 50 वर्षांचे काम असणार आहे. स्टॅटर्जीक पाटन्रशीप  उपक्रम राबविण्यात येणार आहे. लढाऊ विमाने, रनगाडे, हेलिकॉप्टर व युद्धनौका यांच्यासाठी सहकार्य करणार्या कंपन्या.
कोणत्याही देशाची ताकद ही संरक्षणात व त्याच्या स्वयत्ततेत आत्मनिर्भयतेत असते. आपण आयात करणारे संरक्षण साहित्य मोठी किंमत मोजून घ्यावे लागते.
उलट त्यासाठीचे पायाभूत सुविधा आहेत. बुद्धीमत्ता, तंत्राज्ञान, संशोधन आपल्याकडे आहे त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. यामध्ये संरक्षण साहित्य तयार क रणार्या खासगी कंपन्यांनाही ताकद देण्याचा आपला प्रयत्न आहे. असे झाले तर आपण उद्या संरक्षण साहित्य निर्यात करू शकतो.
जगात ग्राहक हा राजा असतो. आपण संरक्षणसाहित्याचे मोठे ग्राहक आहोत. जगातील अनेक कंपन्यांना आपण निमंत्रण देतोय यामुळे परदेशी कंपन्याही भारतात येण्यास उत्सुक  आहेत.
आमच्या देशातील संरक्षण भागिदार हा खासगी असेल अगर पब्लिक सेक्टर मधील असेल याच्या बरोबर टायअप करून साहित्य निर्मिती केंद्र उभारा, आमच्या मणुष्यबळाला प्र शिक्षीत करा असे धोरण असणार आहे. मग ही निर्मिती आपल्याच देशात सुरू होईल. त्या माध्यमातून संरक्षण उद्योगाला चालणा मिळून आपले परकीय चलन मोठ्या प्रमाणात  वाचणार आहे.
पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया अंतर्गत आपण संरक्षण खासगी क्षेत्रासाठी 1999 पासून दरवाजे खूले केले मात्र पाहिजे तसे ते वाढले नाहीत. यासाठी मोदींजींच्या नेतृत्वाखाली मोठे  बदल करण्यात आले आहेत. आता ऑनलाईन 15 दिवसाच्या आत लाइसन्स मिळणार आहे.
त्यांच्यातील किचकट अटी कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे आता अधिक खासगी कंपन्या याकडे आकर्षीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.