Breaking News

देशातील वातावरण बिघडत असून असहिष्णुता वाढतेय - सुशीलकुमार शिंदे

पुणे, दि. 04, ऑक्टोबर - आज वातावरण बिघडत असून असहिष्णुता वाढत असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिंदे  यशवंत वेणू गौरव पुरस्काराच्या वेळी पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. भाई वैद्य यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना यशवंत वेणू गौरव पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.यशवंतराव चव्हाण यांनी सर्वधर्म समभाव हे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आज वातावरण बिघडत असून असहिष्णुता वाढत  आहे. याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ते पिंपरी चिंचवडच्या यशवंत वेणू गौरव पुरस्कार  स्वीकारताना बोलत होते.पुढे ते म्हणाले, मी कोर्टात काम करत होतो, मात्र त्यावेळी मला लाज वाटली नाही. कुठले ही काम करताना लाज वाटता काम नये, आपण  चोरी तर करत नाहीत ना, भीक तर मागत नाहीत, आपल्या मनगटात प्रचंड शक्ती आहे.ती घेऊन पुढे जा, असेते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार  शिंदे, भाई वैद्य, उल्हास पवार, पी डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.