Breaking News

संजीवनी इंजिनिअरिंग कालेजचा बेस बॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम

अहमदनगर, दि. 09, ऑक्टोबर - संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बेसबॉल संघाने पुणे येथिल महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी (एम.आय.टी) ने  घेतलेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धांमध्ये प्रथम विजेते पद जिंकुन संजीवनीने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले  आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ.डी.एन.क्यातनवार यांनी दिली.
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या राष्ट्रीय यशाबद्धल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचा  छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.यावेळी प्राचार्य डॉ.क्यातनवार,क्रीडा संचालक प्रा.गणेश नरोडे उपस्थित होते.डॉ.क्यातनवार म्हणाले की,व्यावसायिक शिक्षण  संस्थांमध्ये क्रीडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले जात नाही अशी सर्व साधारण धारणा असते,परंतु या विचाराला थेट छेद देत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  विद्यार्थी सर्व क्षेत्रात आघाडीवर असतात.सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवुन व्यक्तीमत्वाचे विविध पैलु रूजविण्यासाठी व्यवस्थापनाच्या मार्गदर्षनाखाली विविध उपक्रमांची  अंमलबजावनी संजीवनी मध्ये होत असल्यामुळे संजीवनीने राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसे खेचुन आणली आहेत. एम.आय.टी. तर्फे दरवर्शी राष्ट्रीय  स्तरावरील बेसबॉल स्पर्धा घेण्यात येतात.या स्पर्धांमध्ये संजीवनीचा संघ सातव्यांदा विजयी झाला आहे.पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत संजीवनीच्या संघाने  उपांत्य फेरीत मुंबईच्या अथर्व कॉलेजच्या संघाविरूध्द लढत देत 9-1 अशा गुणांनी सामना जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश केला.अंतिम सामन्यात संजीवनीच्या  संघाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणेच्या संघावर 11-0 अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळविला आणि राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अव्वल असल्याचे  शिक्कामोर्तब केले.कर्णधार अक्षय शिंदे याच्या नेतृत्वाखाली टीममधील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.याच संघाने जिल्हा पाातळीवरही आंतरमहाविद्यालयीन  बेसबॉल सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला होता.