Breaking News

कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेतर्फे रविवारी मुंबईत भव्य मेळावा

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - कोकणसारख्या निसर्गसंपन्न भागात तेल शुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) उभारून होणारा निसर्गाचा -हास रोखण्यासाठी  कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेतर्फे उद्या (रविवार) सकाळी 10 वाजता दामोदर हॉल, परळ येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  यामध्ये मुंबईत रहाणा-या कोकणवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
कोकणात येणारे प्रकल्प हे प्रकल्पबाधित गावच नाही तर संपूर्ण सुंदर कोकण बेचिराख करणार आहेत. कोकणातील जनतेची ताकद काय असते हे सरकारला  दिसणे गरजेचे आहे. आजपर्यंत कोकणी माणूस मुंबईमध्ये कधीही एका व्यासपीठावर आला नाही. त्याचा गैरफायदा सरकारने घेऊन फक्त मतांसाठी आपला  वापर केला गेला. आपले कोकण-आपली मातृभूमी वाचवण्यासाठी आणि एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी कोकणवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून  सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी, असेही संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.