Breaking News

धीरुबाई अंबानी एअरोस्पेस पार्कचा नागपुरात शुभारंभ

नागपूर, दि. 28, ऑक्टोबर - संरक्षण विभागाला लागणार्‍या विमानांच्या सुट्या भागाची निर्मिती करणार्‍या धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचे भूमिपूजन नागपूरच्या मिहान येथे पार  पडले. डसॉल्ट एव्हिएशनचे सीइओ एरीक ट्रॅपियर आणि रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यावेळी उपस्थित होते. या कोनशिला कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली, फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झीग्लर तसेच राज्य आणि शहर प्रशासन आणि  स्थानिक उद्योगातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थितहोते.
रिलायन्स आणि डसॉल्ट यांच्या अनुक्रमे 51 व 49 टक्के भागीदारीत सुरू करण्यात येणारा हा करार अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. या करारांतर्गत फ्रान्सकडून भारताने सर्वोत्तम  मानली जाणारी 36 राफेल लढाऊ विमाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरातील धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये या विमानांच्या सुट्या भागांची निर्मीती केली जाईल.  त्यासोबतच डीआरएएल डसॉल्ट एव्हिएशनने तयार केलेल्या लेगसी फाल्कन टू-थाऊजंड सिरीज़ सिव्हिल जेट्सच्या उत्पादनांचे सुटे भाग देखील इथे तयार होतील. या संयुक्त  उपक्रमामुळे थेट 100 दशलक्ष युरो रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.डीआरएआर नागपूर आणि आसपासच्या परिसरातील हजारो कुशल कर्मचार्यांना प्रशिक्षित करेल. डसॉल्ट  एव्हिएशनचे अध्यक्ष, एरिक ट्रॅपियर यांनी यावेळी जाहीर केले की, हे भूमिपूजन प्रधान मंत्री मोदी यांच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत असून, या मुळे  उत्पादनशीलतेला चालना मिळेल. या वेळी रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल धीरूभाई अंबानी म्हणाले की, नागपूरच्या मिहान स्थित धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्क चे स्वप्न केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते. रिलायन्स आणि डसॉल्टची भागीदारी उच्च पातळीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणास  आणेल. यामुळे जागतिक विमान वाहतूक पुरवठा शृंखलामध्ये भारत एक प्रमुख पुरवठादार बनेल, प्रधान मंत्री मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि स्किअल इंडिया धोरणास पूर्णपणे  साहाय्य करणे आणि एरोस्पेस क्षेत्रातील भारताच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी डसॉल्ट आणि रिलायन्सचा प्रयत्न असेल. या प्रकल्पातून जानेवारी 2018 पासून उत्पादन  सुरू होणार आहे. राफेलच्या निर्मितीसाठी डसॉल्ट एव्हिएशनने 30 हजार कोटी गुंतवणूक केली असून, हा संयुक्त उपक्रमाचा अंतर्गत करार 50 वर्षासाठी असणार आहे. या प्रक ल्पातून 10 हजार रोजगार निर्मिती होणार असून, शंभराहून अधिक फाल्कन विमानांची निर्मितीही होणार असल्याचे अंबानी यांनी सांगितले. याप्रसंगी कोकीळाबेन अंबानी, टीना  अंबानी, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे