Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सदस्य व नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - शहर जिल्हा व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवनिर्वाचित बुरुडगाव विविध कार्यकारी सोसायटी सदस्य तसेच  नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, नवनाथ  वाघ, ग्रामपंचायत सदस्य खंडू काळे, अजिंक्य कुलट अमोल कर्डिले, गौरव विधाते, देवीदास टेमकर आदि उपस्थित होते.
माळीवाडा येथील शहर जिल्हाध्यक्ष विधाते यांच्या संपर्क कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात बुरुडगावचे नवनिर्वाचित सोसायटी सदस्य बापूसाहेब कुलट,  आप्पासाहेब कुलट, संजय कुलट, भाऊसाहेब कुलट, उध्दव कुलट, दत्तात्रय कर्डिले, संभाजी शिंदे, जब्बार शेख, रावसाहेब मोडवे, सुरेश एकाडे, घनश्याम  फुलारी, विकास जाधव, सुभाष पाचारणे तर आगडगावचे  सरपंच मच्छिंद्र कराळे, मदडगाव (टाकळी) सरपंच अनिल शेडाळे यांचा सत्कार करण्यात आला.