Breaking News

महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी भाजप प्रयत्नशील - योगेश गोगावले

पुणे, दि. 23, ऑक्टोबर - महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी भाजप प्रयत्नशील असून छोट्या छोट्या उद्योगांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करणे आणि त्यांच्या उत्पादनांना  बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असलचे मत भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केले. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि क्रिएटीव्ह फाउंडेशन ने  आयोजित केलेल्या माझी दिवाळी स्वदेशी दिवाळी या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. खिलारेवाडी येथे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि क्रिएटीव्ह फाउंडेशनने माझी  दिवाळी स्वदेशी दिवाळी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या आयोजनाचा उद्देश सांगताना मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या की चिनी वस्तूंनी आपली बाजारपेठ व्यापली असून, चीन वरू न येणार दुय्यम प्रतीचा माल स्वस्तात आपल्या गळ्यात मारण्यात येतो, हे छुपे युद्ध असून आपण त्यांच्या वस्तू विकत घेतल्याने त्यांची दिवाळी होते पण आपल्या छोट्या व्यावसा यिकांचा रोजगार बुडतो, त्यामुळे कोणत्याही वस्तू घेताना त्या भारतीय बनावटीच्या आहेत याची खात्री करूनच विकत घ्या.स्वदेशीचा वापर ही लोकचळवळ झाली पाहिजे असे ही  त्या म्हणाल्या.