Breaking News

नगरपालिकेविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार - अमर साबळे

पुणे, दि. 23, ऑक्टोबर - बारामती शहरातील श्री गणेश मार्केट उद्घाटनप्रसंगी बारामती नगरपालिकेने राजशिष्टाचाराचे पालन केले नसल्यामुळे याप्रकरणी आपण नगरपालिकेविरुद्ध  राज्यसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार असल्याची माहिती खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुढील काळात बारामतीत होणार्‍या सर्व शासकीय बैठकांना खासदार या नात्याने आपल्याला निमंत्रित करण्याच्या सूचना आपण येथील उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्याचे त्यांनी  सांगितले.राजशिष्टारानुसार राज्यसभेचा सदस्य व या गावचा सुपुत्र या नात्याने आपले नाव निमंत्रणपत्रिकेत असणे अनिवार्य होते. दुर्देवाने नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी  हा राजशिष्टाचार पाळला नाही ही बाब निंदनीय व दुःखदायक असल्याचे साबळे म्हणाले.