Breaking News

कुर्ला परिसरात मध्यरात्री 9 रिक्शांची अज्ञातांकडून तोडफोड

मुंबई, दि. 23, ऑक्टोबर - शनिवारी मध्यरात्री कुर्ला परिसरात 9 रिक्शांची तोडफोड केल्याची घटना घडली. येथील शेल कॉलनी परिसरात रात्री रस्त्याच्या कडेला रिक्शा पार्क क रण्यात आल्या होत्या. तोडफोड प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोडफोड करण्यामागे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र यामुळे रिक्शा मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे पुणे व पिंपरी परिसरातही वाहन तोडफोडी  झाल्या होत्या. आता मुंबईतही ही घटना घडली.