Breaking News

छ. संभाजीराजे साखर कारखान्याच्या गळित हंगामाला गडकरींच्या हस्ते सुरूवात

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - करमाड छत्रपती संभाजी राजे साखर कारखान्याच्या गळीत हंगामास येत्या रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. हा  17 वा गळीत हंगाम आहे. यावेळी अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे राहणार असून विशेष अतिथी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, सहकारमंत्री  सुभाष देशमुख, साई शुगर मिल्सचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे हे उपस्थित राहणार आहेत.
गळीत हंगामाची पूर्णपणे तयारी झाली असून चालू वर्षी दोन लाख पन्नास हजार टन ऊस गाळपाची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे व्यवस्थापक दिगंबर बडदे  यांनी बोलताना दिली. यावर्षी प्रथमच उसाची तोडणी हार्वेस्टरने होणार असल्याने शेतक-यांना लाभच होणार आहे, असे ते म्हणाले.