Breaking News

भाजपच्या ॠआश्‍वासनाचा फुगा’ जनताच फोडेल - नवाब मलिक

मुंबई, दि. 01, नोव्हेंबर -  ‘छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ’ असे निवडणूक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आ णि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे.  परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज येथे व्यक्त केला. 
अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही  केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया  पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील  जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्‍वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारे भाजप सरकार हे जातीचे राजकारण करण्यात मागे राहिलेले नाही. भाजप सरकारच्या प हिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये धनगर समाजाला ओबीसीमध्ये घेण्याचे आश्‍वासन दिले. परंतु त्यानंतर अनेक कॅबिनेट बैठकी झाल्या, धनगर समाजाचा प्रश्‍न सोडवला नाही. मुस्लिम  समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्याचा हायकोर्टाच्या निर्णयाचीही अंमलबजावणी या सरकारने केलेली नाही. मराठा आरक्षणही अदयाप दिलेले नाही. एकंदरीतच हे सरकार  जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे, असेही मलिक म्हणाले.
सरकारने विदयार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणांमध्येही गोंधळ घातला आहे. मुंबई विदयापीठाने परिक्षांच्या निकालामध्ये घातलेला गोंधळ आणि त्यानंतर पालकांची आणि विदयार्थ्यांची  उडालेली तारांबळ हे सरकारचेच पाप होते. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मुंबई विदयापीठाच्या कुलगुरूंची हकालपट्टी झाली, हेच का सरकारचे यश? बेसलाईन परिक्षा  असतील, अनेक जातींसाठी असलेल्या शिष्यवृत्त्यांमध्येही सरकारने गोंधळ घातला आहे. याला हे भाजप सरकारच जबाबदार आहे.