Breaking News

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी!

मेहकर तालुका काँग्रेस अध्यक्ष देवानंद पवार यांचा सामाजिक उपक्रम 

बुलडाणा, दि. 23, ऑक्टोबर - लक्ष लक्ष दिपावली म्हणजे दिव्यांचा सन आज्ञानाकडून प्रकाशाकडे, गरीबीतून श्रीमंतीकडे, दुखा:तून आनंदाकडे, वाटचालीस प्ररणा देणारा सणांचा  सण. या दिवाळी सणाचे निमित्त साधून गोरगरिब दीन दलीतांच्या दुख: कमी करण्याचा प्रयत्न समाजाती काहि लोक करत असतात. त्यातील एक म्हणजे सामाजिक कार्यकर्ते व  भारतीय राष्ट्रिय काँग्रेस मेहकर तालुका अध्यक्ष देवानंदभाऊ पवार स्वत:च्या आयुष्यातील आनंद दुसर्‍याला वाटल्याने वाढतो. मागिल अनेक वर्षापासून देवानंदभाऊ सामाजिक क ार्यातून हा वसा मोठ्या प्रमाणवर राबवत असतात. 
राजकारण करत असतांना समाजकारण विसरायचे नसते. याचाच प्रत्यय दिवाळीच्या दिवशी जानेफळ शेजारील पार्डी या गावातील आदीवासी पारधी समाजाच्या पाड्यावरील आ दिवासी बांधवांना आला. सामाजिक जाणीवाने निर्वाण पासून कोसो दुर असणारा हा समाज परंतु देवानंदभाऊ पवार या सारख्या सामाजिक जाणीवा तिव्र असणार्‍या लोकांमुळे हा  समाज सामाजिक प्रवाहात आला आहे. सर्व लोक मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत असतात. देवानंदभाऊ आणि त्यांचे सहकारी मात्र आदिवासी बांधवांन सोबत फराळाचा  आनंद घेत होते. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहीजे या उक्ती प्रमाणे त्यांनी प्रत्येक दिवाळी सण आदिवासी बांधवांन सोबत दिन दलीत बांधवांना सोबत घेवून करण्याचे ठर विले. आदीवासी बांधवांना फराळ व मिठाई चे वाटप केले. व सर्वांनी आदिवासी बांधवांनसोबत फराळही घेतात. त्या प्रसंगी आदिवासी बांधवांनी विरार व्यक्त करुन देवानंद यांनी  केलेल्या कार्याबद्दल आभार मानले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व देवानंदभाऊ च्या या कार्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी शर्मर सपकाळ, जमील भाई, सुभाष अत्तर, पप्पु लोखंडे, प्रयागराज काळे, बाळकिसन जाधव, नमपाल सर, संतोष शेळके, रमेश शेलार, विश्‍वास दुतों डे, विलास पवार, योगेश सपकाळ, कैलास उबाळे, गोपाल व्यवहारे, उज्वल गवई, शत्रुघन मोरे, गौरसिंग  चव्हाण, भगवान शेलार, बोधमल पवार, हिरामन भोसले, तारा भोसले, स चिन गाडे, रजीस्टर भोसले, इत्यादी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन कृष्णा हावरे सर यांनी केले. तर याप्रसंगी विष्णु वाकळे, डॉ.क ाकडे, अमर राऊत, गणेश सवडतकर हे आवर्जुन उपस्थित होते.