Breaking News

दिव्या फाऊंडेशनची गोरगरिबांसोबत दिवाळी

बुलडाणा, दि. 23, ऑक्टोबर - दिवाळी सण म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण समजला जातो. मात्र समाजातील तळागाळातील, उपेक्षित घटकांमध्ये अठरा विश्‍वे दारिद्य्र असल्याने  अशा घटकांमध्ये जावून त्यांच्यात दिवाळी सण साजरा करून, त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचे काम दिव्या फाऊंडेशन व सर्वधर्म सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  अशोक काकडे व त्यांच्या सदस्यांनी या दिवाळीचे दोन दिवस केले.
गेल्या दोन वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक व लोकोपयोगी उपक्रम दिव्या फाऊंडेशन व सर्वधर्म सामाजिक संघटनेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्ष णिक साहित्याचे वाटप, गणवेश, स्कूलबॅग वाटप असे विविध उपक्रमांचा उल्लेख करता येईल. समाजातील वंचित घटक, गोरगरिब, अनाथ, मतीमंद, निराश्रीत यांच्या काळोखामय  जीवनात प्रकाशाची किरणे पडावीत या हेतूने संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून या दिवाळी सणामध्ये पळसखेड सपकाळ जवळ असलेल्या सेवा संकल्प प्रक ल्पावर जावून या फाऊंडेशनच्या वतीने त्या ठिकाणी असलेल्या मतिमंद, अनाथ, मनोरूग्ण यांना फटाके, कपडे, मिठाईचे वाटप करण्यात आले.
पारधी समाजाच्या झोपडपट्टी भागामध्ये जावून दिवाळीनिमित्त मिठाई, फटाके व पुरूषांना कपडे व महिला भगिनींना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच जालना रोडवरील औद्यो गिक परिसरात पालात रहाून जीवन जगणारे कुटूंबियांत जावून फाऊंडेशनच्या सदस्यांनी मिठाई, कपडे, फटाके वाटप करून दिवाळी साजरी केली. तसेच दिवसरात्र कर्तव्यास  असणारे महाराष्ट्र पोलीस कर्मचार्‍यांनाही दिवाळीनिमित्त मिठाई देवून दिवाळी शुभेच्छा दिल्या. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचे घटक असलेल्या व जागरूक राहून पत्रकारिता क रणार्‍या पत्रकार बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा देवून तसेच मिठाई देवून दिव्या फाऊंडेशन व सर्वधर्म सामाजिक संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आगळी-वेगळी  दिवाळी साजरी केली.