नोटबंदीमुळे आणि जीएसटीमुळे विकस दर मंदावला
नवी दिल्ली, दि. 11, ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय नाणे निधी अर्थात आयएमएफनेही भारताच्या विकासदरात घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या आर्थिक वर्षात विकासदर 6.7 टक्के राहू शकतो. विकासदर 7.2 टक्के राहिल, असा अंदाज यापूर्वी वर्तवण्यात आला होता. मात्र येत्या काळात विक ासदरात सुधारणा होईल, असंही आयएमएफने म्हटलं आहे.
भारताचा विकासदर मंदावला असल्याचं आयएमएफने जागतिक अर्थव्यवस्थेवरील अहवालात नमूद केलं आहे. नोटाबंदी आणि आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जीएसटी लागू करण्याचे हे परिणाम आहेत, असं आयएमएफने म्हटलं आहे.
भारताचा विकासदर मंदावला असल्याचं आयएमएफने जागतिक अर्थव्यवस्थेवरील अहवालात नमूद केलं आहे. नोटाबंदी आणि आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जीएसटी लागू करण्याचे हे परिणाम आहेत, असं आयएमएफने म्हटलं आहे.