Breaking News

नागरिकांच्या जागृती शिवाय सीमेवरची लढाई थांबणार नाही

अ‍ॅड. मोहिते यांचे प्रतिपादन  ‘एक पणती जवानांसाठी कार्यक्रम’ उत्साहात

अहमदनगर, दि. 23, ऑक्टोबर - आजकालची लढाई देशाच्या सीमेवर नाही तर देशामध्ये विविध ठिकाणी होत आहे. जोपर्यंत नागरिकांमध्ये याबाबत जागृती होत नाही, तोपर्यंत  लढाई थांबणार नाही. त्यामुळे जवानांचे कार्य व त्यांच्या प्रती आदर व्यक्त करतांना समाज जागृतीसाठी एक पणती जवानांसाठी  हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे प्रतिपादन अ‍ॅड अक्षय  मोहिते यांनी केले. 
नेवासे शहरातील स्वातंत्र्यकालीन ऐतिहासिक मोहिते चौकात झेंडावंदन पटांगणावर जवानांच्या स्मरणार्थ व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शहीद जवानांना आदरांजली अर्पण क रण्यासाठी एक पणती जवानांसाठी  हा कार्यक्रम दिवाळीनिमित्त घेण्यात आला.  अ‍ॅड अक्षय मोहिते व सतीश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून आझाद हिंद मित्र मंडळाच्या वतीने हा क ार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ज्या देशांत जवानांप्रती सद्भावना असते. तो देश नेहमीच प्रगती पथावर असतो देशचा रक्षणकर्ता जवान आहे. सीमेवर लढणारे जवान हे शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जवान आणि  शौर्य या दोन वेगळ्या गोष्टी नसून एकच आहेत. महाराष्ट्रात सैनिकी परंपरा आहे. देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या सैनिकांमागे त्यांच्या पत्नी आई आणि बहिणींसह संपूर्ण कुटुंब असते.  त्यांच्या पाठिंब्यावर ते लढाई लढू शकतात अशी भावना अ‍ॅड अक्षय मोहिते यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्योत्तर काळात या ऐतिहासिक झेंडावंदन पटांगणात स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा होत असत. अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, काकासाहेब गाडगीळ,  साने गुरुजी, पत्री सरकारचे क्रांतिसिंह नाना पाटील अशा नेत्यांच्या सभा येथे झाल्या होत्या.
नेवाशातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी येथे ध्वजस्तंभाची स्थापना करून तिरंगा उभारला व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे येथे आनंदोत्सव साजरा क रण्यात आला होता. तेव्हापासून या ठिकाणी 26 जानेवारी व 15 ऑगस्टला ध्वजारोहण केले जाते व ती परंपरा आजही सुरु आहे. झेंडावंदन माजी स्वातंत्र्यसैनिक, जवान, डॉक्टर,  वकील अशा आदरणीय व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. ही परंपरा येथील आझाद हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष भैय्या काझी व गल्लीतील लोकांनी सुरु ठेवली आहे. एक पणती  जवानांसाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किसनराव जपे व इब्राहीम मणियार यांच्या हस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन मेजर दीपक देशमुख, मेजर धर्मा काकडे, सध्या हिमाचल प्रदेश येथील कुल्लू येथे कार्यरत असलेले मेजर गणेश नगरे व नेवासा येथील पोलीस निरीक्षक प्रविणचंद  लोखंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व भारतमातेचा जयजयकार करीत राष्ट्रगीताने सांगता झाली. आझाद हिंद मित्र मंडळातर्फे दिवाळीनिमित्त देशासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या  जवानांचा तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला डॉ नितीन करवंदे, अ‍ॅड बाळासाहेब कुलकर्णी, मौलाना अब्दुल रहेमान, प्रा रमेश शिंदे, अशोक मोहिते, भैय्या काझी, राम देशपांडे, जाफरशेठ पठाण, बबन उपाध्ये,  रम्हूशेठ पठाण, वसंतराव मोहिते, शंकरराव अंबीलवादे, सुभाष मोहिते, सलीम देशमुख, संदीप मोहिते, विनायक अंबीलवादे, मकरंद देशपांडे, रुपेश उपाध्ये, बाळासाहेब बनकर,  बाळासाहेब देशपांडे, जयसिंग मोहिते, डॉ स्वप्नील बल्लाळ, सागर शिंदे, शुभम उपाध्ये, शेखर गव्हाणे, बबलू सय्यद, सतीश पिंपळे, संतोष कुंढारे, खाजा मणियार, अमित लोळगे,  मनोज गरुटे, अभिजीत बडवे, किरण अंबीलवादे, शाम आडगावकर, भैय्या कावरे, अमोल देवचक्के, अनीस देशमुख, प्रसाद पाटील आदींसह सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांची  मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सुत्रसंचालन अ‍ॅड अक्षय मोहिते यांनी केले तर सतीश क्षीरसागर यांनी आभार मानले.