Breaking News

दाऊदच्या मालमत्तेंचा सरकारकडून लिलाव

मुंबई, दि. 19, ऑक्टोबर - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. दाऊदच्या सहा मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकार करणार आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी केंद्राने हॉटेल रौनक अफरोझ म्हणजेच ‘दिल्ली झायका’चा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. आता याच हॉटेलसोबत आणखी पाच मालमत्तांचा लिलाव करण्याची घोषणा अर्थमंत्रालयाने केली आहे.
स्मगलर्स आणि परदेशी विनिमय नियंत्रक कायद्या च्या प्रशासकांनी वर्तमानपत्रात सार्वजनिक लिलावासंदर्भात जाहिरात दिली आहे. 14 नोव्हेंबर 2017 रोजी सहाही मालमत्तांचा लिलाव होणार असून बेस किंमत 5.54 कोटी रुपये असेल. यामध्ये भेंडी बाजार परिसरातील दमरवाला इमारतीचा समावेश आहे. या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुबईला जाण्यापूर्वी दाऊद याच परिसरात राहत असे. दाऊदची आई अमिना बी यांनी ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती.