Breaking News

स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त असलेली महाराष्ट्र वार्षिकी पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध

जळगाव, दि. 31, ऑक्टोबर - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ ही पुस्तिका नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राची अधिकृत, वस्तु निष्ठ माहिती देणार्‍या पुस्तकाची गरज अनेक वर्षापासून व्यक्त केली जात होती. महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महाराष्ट्र वार्षिकी  2017 च्या रुपाने ही गरज पूर्ण झाली आहे.
या पुस्तिकेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रातील जिल्हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्य शासनाच्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी,  भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य, संसद सदस्य आदींची माहिती समाविष्ट क रण्यात आली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिध्द केलेली महाराष्ट्र वार्षिकी 2017 ही पुस्तिका विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, राजकीय नेते,  सामान्यज्ञानाची आवड असणार्‍या सर्व नागरीकांना उपयुक्त आहे.
महाराष्ट्र वार्षिकी 2017 या पुस्तिकेची किंमत फक्त 300 रुपये आहे. या पुस्तिकेसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. 3, पहिला मजला, आक ाशवाणी केंद्राजवळ, जळगाव. दूरध्वनी क्रमांक 0257/2229628 येथे तसेच उप माहिती कार्यालय, ‘छाया’ निवास, स्टेट बँक इमारत, भडगाव रोड, चाळीसगाव दूरध्वनी क्र.  02589/222508 येथे संपर्क साधवा. या पुस्तिकेच्या प्रती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच पुस्तक विक्रेत्यांना सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येईल. पुस्तिकेच्या  मर्यादित प्रती शिल्लक असल्याने गरजूंनी तातडीने जिल्हा व उप माहिती कार्यालयाशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास  बोडके यांनी केले आहे.