Breaking News

वैजापूर येथे गुटखा विकणा-या दुकानदारांना अटक

औरंगाबाद, दि. 28, ऑक्टोबर - वैजापूर पोलिसांनी शहरातील पान टप-या तसेच दुकाने तपासली. या दरम्यान चार ठिकाणी गुटखा सापडला असून त्याची किंमत 80 हजार  आहे. शहरात गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. तपासात चार ठिकाणी गुटखा आढळून आला. परवेज खान सुलत्तान खान (23), स्वप्नील जयकुमार गंगवाल  (34) कलीम शेख रसुल (38) व अन्य एक आरोपी अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.