Breaking News

दिवाळीच्या सुटीत हजाराच्यावर पर्यटकांनी दिली गांधीतीर्थला भेट

जळगाव, दि. 28, ऑक्टोबर - गांधीतीर्थला दिवाळीच्या सुटीत हजाराच्यावर पर्यटकांनी भेटी दिल्यात. जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसरातील अहिंसा, सत्य, समता आणि शांतेतेची  शिकवण देणार्‍या गांधीतीर्थचा परिसर पर्यटकांसाठी खुणावत असून अवघ्या पाच वर्षात दोन लाखाच्यावर पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली आहे. यात जळगाव परिसरातील नागरीक ांसह देशाच्या विविध राज्यासह विदेशी पर्यटकांचाही सहभाग आहे.
जैन हिल्स परिसरातील गांधी रिसर्च फांऊडेशनतर्फे आंतराष्ट्रीय दर्जाचे गांधीतीर्थ हे पर्यटनस्थळ आहे. या परिसरात असलेल्या गर्द झाडांमुळे निर्माण झालेली नैसर्गिक संपदा डोळ्यांचे  पारणे फेडत आहे. त्यातच विविध रंगांची फुले मन उल्हासीत करतात. यातच पावसाच्या सरी बरसल्या तर पर्यटकांना निसर्गाची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. सिमेंटच्या  जंगलात आणि वाहतुकीच्या गोंगाटात अडकलेल्या शहरवासियांना मात्र अशा आनंदाची अनुभूती क्वचितच लाभते. पर्यटकांसाठी जैन हिल्स परिसरात आंतराष्ट्रीय दर्जाचे गांधीतीर्थ येथे  ही अनुभूती अनुभवण्यास मिळत आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी भटकंतीचे नियोजन अनेक करीत असतात. यात शांततेची आणि प्रदुषण विरहीत ठिकाणांना पसंती दिली जाते. नैसर्गिक संपदा असलेल्या  जैन हिल्सच्या परिसरातील गांधीतीर्थ हे अहिंसेसह शांततेची शिकवण देणारे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी दिवाळीच्या सुट्यांच्या निमित्ताने गांधीजींच्या विचारांचा  फराळ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक आलेत. निसर्गप्रेमींनी दिवाळीच्या सुटीचा आनंद गांधीतीर्थ येथे येवून घालविला. अवघ्या तीन दिवसात हजारो कुटुंबियांनी येथे भेट दिली  आहे. यात विदेशी नागरीकांचाही सहभाग आहे.
आतापर्यंत 2 लाख पर्यटकांनी दिल्या भेटी
गांधीतीर्थचे लोकार्पण झाल्यानंतर 1 मे 2012 ते 22 ऑक्टोबर दरम्यान 2 लाख 12 हजार 401 पर्यटकांनी गांधीतीर्थला भेटी दिल्यात. यात सुमारे 897 परदेशी नागरीकांचाही  समावेश आहे. तर शेतकरी 6 हजार 784, विद्यार्थी 16 हजार 384, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह इतर 1 लाख 90 हजार 336 पर्यटकांनी गांधीतीर्थला भेट दिली आहे.