Breaking News

कल्याण-डोंबिवलीत मनसे संघटनेत मोठे बदल

कल्याण, दि. 28, ऑक्टोबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त  पी. वेलरासू यांच्याशी विकासकामांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. ठाकरे यांनी  पक्षाला उभारी देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. डोंबिवली शहरात पक्षाअंतर्गत फेररचना करत अकार्यक्षम पदाधिकार्‍यांना पदावरून  हटवून नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे.
फेरीवाले, शहरातील स्वच्छता यांसह विविध मुद्द्यांवर राज ठाकरेंनी आयुक्तांशी चर्चा केली. कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांवर कारवाई का नाही?, असा प्रश्‍न विचारत  रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्‍चित करण्याचीही मागणी राज ठाकरे यांनी केली.
केडीएमसीत मनसेचे गटनेते असलेले प्रकाश भोईर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद, तर दीपिका पेडणेकर महिला जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. कल्याण ग्रामीण आणि  डोंबिवली विधानसभा हे यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. प्रकाश भोईर यांच्या रुपाने सक्षम जिल्हाध्यक्ष मिळाला आहे.